अजूनही मुंबईमधल्या फूटपाथवर वापरलेली, जुनी, used म्हणजे सेकंड हँड पुस्तके मिळतात. तिथे घेतलेले... अशी सेकंड हँड पुस्तके तर कित्येक वेळा विकत आणली होती आणि वाचून वाचून अक्षरशः पारायणे केली होती त्यांची.....
लेखिका जोहाना स्पायरी यांच्याविषयी थोडीशी माहिती :
अनाथ हायडी (Heidi) मावशीकडून आजोबांकडे (वडिलांचे वडील) रहायला येते... मस्त डोंगरावर राहते, पिटर नावाचा छोट्या मेंढपाळाच्या संगतीने रमते... सुरवातीला कडक, मनात अढी असलेले आजोबा हळूहळू तिला आपलेसे करून घेतात म्हणण्यापेक्षा तीच त्यांची माया जागी करते... अचानक एक दिवस हायडीची रवानगी शहरात एक आई वारलेली आणि वडील कामात व्यस्त असल्याने घर सांभाळणारी बाई (गव्हर्नेस) बरोबर राहणाऱ्या अपंग क्लारा (Clara) ची सोबत करण्यासाठी केली जाते... गावाकडे डोंगरावर राहणारी हायडी हळूहळू शहरात रूळते... कोणत्याही प्रकारच्या भेदभावाविना दोघींची घट्ट व निखळ मैत्री होते पण हायडीला एक दिवस पुन्हा गावी परतावे लागते... क्लारा तिच्या आठवणीने व्याकूळ होऊन तिच्याकडे जाते... मैत्री, मोकळे वातावरण, पोषक आहार आणि हायडीच्या आजोबांच्या ज्ञानाचा वापर होऊन फिजिओथेरपी द्वारे क्लाराचे आयुष्य बदलते...
लेखिका जोहाना स्पायरी लिखित एक निरागस मुलगी हायडी (Heidi) ची ही सुंदर कथा... नक्की वाचा...!
या कथेला अॅनिमेशन स्वरूपातही काही वर्षांपूर्वी कार्टून नेटवर्क या टीव्ही चॅनेलवर दाखवले होते.... या पुस्तकाची अनेक अडाप्टेशन्स आहेत असे कळले.
'हायडी' चे अॅनिमेशन स्वरूप :
https://www.youtube.com/playlist?list=PLS6WGd3J_H0rzQvtmkDDs0_8Jg70wZOn0
माझे रेटिंग ५-स्टार्स ⭐⭐⭐⭐⭐
No comments:
Post a Comment