'ड्रीमरनर' (ऑस्कर पिस्टोरियस, सहलेखक गियान्नी मेरलो).
याचा अनुवाद केला आहे लेखिका सोनाली नवांगुळ यांनी.... (मनोविकास प्रकाशन).
इंग्रजीमधे 'ब्लेडरनर' म्हणून ओळखला गेलेला, प्राॅस्थेटिक्सचा वापर करणारा, पॅरॅलिम्पिक्सच नव्हे, तर ऑलिंपिक्स आणि इतर अनेक शर्यतीत भाग घेत, प्राॅस्थेटिक्सचा वापर तांत्रिक फायदा तर देत नाही याची खात्री करून घेतली जाईपर्यंत बंदीला तोंड देत, तसे नसल्याचे वैद्यकीय आणि वैज्ञानिक तपासणी करून सिद्ध करत, विश्वविक्रम रचणाऱ्या धावपटू ऑस्कर पिस्टोरियस याचे धावपटू म्हणून घडतानाचे आयुष्य आणि वैयक्तिक आयुष्य उलगडणारे पुस्तक.... त्याच्यावर गर्लफ्रेंडच्या हत्येचा आरोप लागण्यापूर्वी हे पुस्तक लिहिले गेलेले...
जन्मतः अम्प्युटेशनची गरज असलेले पाय घेऊन जन्मलेले बाळ पुढे विश्वविक्रम करणारा धावपटू होईल असे कुणाला वाटले पण नसेल.....
कधी चालण्याचाही अनुभव नसलेली मी... त्यामुळे या धावपटूचे अनुभव, त्यातील तांत्रिक बाबी आणि माहिती समजून घेताना माझी स्वतःची अक्षरशः कसरत झाली.... पण त्यात दिसला एक अतिशय पॅशनेटली मेहनत करणारा धावपटू, लँडमाईन (भुसुरुंग)ने हात-पाय गमावलेल्या माणसांना आर्टिफिशियल लिंब्स वापरणाऱ्यांना आपला प्राॅस्थेटिक्सचा अनुभव उपयोगी पडावा म्हणून काम करत असणारा समाजसेवक....
त्यावेळी पुस्तक अनुवादित करताना, इंग्रजीमधून मराठीत भाषांतर करताना सोनाली कदाचित नवखी असावी अनुवादात, म्हणून सुरुवातीला काही वेळा वाक्यरचना जशीच्या तशी वाटली पण पुढे इतके ते मस्त जमले आहे की असे वाटते ऑस्कर पिस्टोरियस स्वतःच आपल्यापाशी गप्पा मारत बसला आहे....!
एक वेगळा विषय असलेले खूप सुंदर पुस्तक आहे ! नक्की वाचा.... धावपटू म्हणून त्याच्याकडे बघा, तर त्या पुस्तकाच्या लेखनाला न्याय मिळेल... ऑस्कर स्वत:सुद्धा याच कारणासाठी आरोपाला सामोरा गेला, हे सिद्ध करण्यासाठी की मेहनतीने तयार झालेला खेळाडू हा खेळाडू असतो, त्यात कोणताही भेदभाव नको.....
या पुस्तकाला GoodReads वर माझे ३ स्टार रेटिंग :
No comments:
Post a Comment