Tuesday, 24 November 2020

The Art of Paint Pouring : Amanda VanEver (Walter Foster Publishing, an imprint of Quarto Publishing Group, USA)

There are some days, when something suddenly grabs not just attention of the eyes, but takes up its own place in the heart…. It doesn’t let the mind get rid of thinking about it… Similarly, last year, my eyes caught an attention to a type of painting… It was kind of abstract. But, too beautiful to explain in words… Didn’t even know what it was called or how it is created. Kept finding about it. Didn’t even know who can guide more about it. Yet, kept searching. Not just online…. Kept reading about it, saw many videos along with the completed paintings, studied many tutorials, kept reading interviews of the artists who created this type of paintings. Search led to the results…! 
A book 'The Art of Paint Pouring' by Artist Amanda VanEver (Walter Foster Publishing, an imprint of Quarto Publishing Group, USA) is one perfect book to learn in depth this art technique. 

Artist Amanda VanEver on YouTube - 
https://www.youtube.com/channel/UCW1h2YeyIOSI8fsZDcRBDfw

Information about art of paint pouring :
Method is called ‘acrylic pour painting’ / ‘acrylic pour’. (Pour = ओतणे). There are types of pour painting, for example, dirty pour, striated, etc. Pour painting is created using acrylics (fluid acrylic inks / heavy / medium / soft body), mixed up with proportionate pouring medium and water. Also, to get cell formations, it is needed to add few drops of silicone oil / resin to the mixture. Very messy it is to appear during the process but, once done, it is marvellous….! It requires lot of patience, perseverance and dedication, a readiness to mess up…. There’s nothing right, nothing wrong in the process once the proportion becomes appropriate for the desired results. It is like trusting in the unknown. It can be done on stretched canvas (better than non-stretched canvas as it is better to handle while tilting from sides by holding in the hands), wood or any material that can be compatible with the acrylic colours. Not just for painting on canvas, it can be used commercially also for jewellery making, pot-decorations, etc. The pouring medium can be either glossy or matte finish. I preferred glossy to use. I didn’t use the silicone oil as I wanted to create a first pour painting with basic technique. Next time, I will try to work with silicone oil to create the cells in the painting. Most messy part of the painting is tilting the canvas once the mixture is poured on it. It takes up 24 hours to 2-3 days approximately to let it completely dry, (without moving it at all to avoid the spoiling of the desired appearance), considering the humidity or heat in the weather (hair dryer technique shouldn’t be used at all to avoid the cracks) and the proportion of pouring medium and water along with the type of acrylic colours used. Heavy = thick acrylic colours with highest possible pigmentation with need of more proper stirring of pouring medium to avoid lumps and bubbles. Medium = less thick. Soft = fluid acrylic colours which need less pouring medium as they are already semi liquid and viscous (able to flow). Fluid acrylic inks are not same as soft body acrylics. Acrylic colours in tubes (heavy / medium / soft body) are preferable as they can be put up in the glass (disposable is preferable than stainless steel to avoid time cleaning later), only as much as needed. Taking out acrylic colours from a tiny bottle becomes bit tougher to put it into the glass for creating the mixture. Cell formation with silicone oil drops is whole different thing. Ideal ratio of the proportion is 1 part colour : 2 parts pouring medium : 2 to 3 teaspoons or more of water. Stir it up with the wooden sticks or spoons. A plastic or thick placement of waste newspapers is necessary to clean up later. Care should be taken to not let the glass containing the mixture slips out of the grasp of the hand while pouring, else it will be a destruction of all the efforts. Putting up gloves is required to avoid any skin infection (I didn’t use gloves though, as I had already bought non toxic pouring medium). Using a thick brush or fingers to touch up the sides of the stretched canvas is required to maintain the consistency in the overall appearance.
Pouring and tilting is the key to the successful pour painting!

There are types and techniques of paint pouring :
Dirty pour, swiping, dipping, pulling, hammering, pouring through a colander, etc.

The book also provides helpful information about the tools and materials required to create a paint pour artwork.

The book also provides insight how to use the art of paint pouring for commercial purposes as an artist. 

If you are ready to learn new art technique, go ahead for it with this book! Worth the cost. I bought it from Amazon.
My star-rating full 5-stars ⭐⭐⭐⭐⭐

Tuesday, 10 November 2020

फाईव्ह पॉईंट समवन : लेखक चेतन भगत (रूपा पब्लिकेशन)

 


सर्वसाधारणतः बॅचलर लाईफ म्हणजे मौजमजा, आशा-निराशा, अपेक्षा, अपेक्षाभंग, स्वप्नं, ध्येय, यशापयश, उदासिनता, प्रेम, असफल प्रयत्न तसेच या सगळया गोष्टींमधून आयुष्यात पुढे पुढे जात राहणे, या सगळ्यातून हळूहळू आयुष्य स्थिरस्थावर करणे, परिपक्व होत जाणे. हेच या काल्पनिक कादंबरीमधून दर्शविण्यात आले आहे.

या काल्पनिक कथेची मांडणी मात्र वास्तवात, प्रत्यक्षात असलेल्या प्रथितयश आय. आय. टी. (मुंबई) (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, मुंबई) या ठिकाणावर आधारली आहे. या संस्थेत प्रवेश मिळणे म्हणजे अतिशय कठीण पण ते शक्य झाल्यास स्वप्नपूर्ती झाल्यात जमा म्हणावी, उज्वल भविष्याची खात्री ! अशी ही संस्था म्हणजे 'होतकरू, प्रचंड बुद्धिमान, अतिशय विद्वान' मानले गेलेल्या इंजीनियरिंग शिकणार्‍या विद्यार्थी - विद्यार्थिनी यांची जणू स्वतःची नगरी... इथे कमी पॉईंट मिळवणारे म्हणजे जणू 'ढ'.... 

अर्थात, सगळया नियमाला अपवाद असतो तसा इथेही.... इथे प्रवेश मिळवणारे सगळेचजण काही सर्वमान्य असलेल्या 'बुद्धिमान' किंवा' अतिशय विद्वान' असल्याच्या परिमाणांमधे बसत नाहीत. त्यांची बुद्धिमत्ता समाजाच्या ठरलेल्या साच्यात बसवता येत नाही, बसत नाही. त्यामुळे अशा साच्यात बसवू पाहणार्‍या, यशापयश एकाच मोजपट्टीने मोजू पाहणार्‍या मानसिकतेसोबत या विद्यार्थ्यांना लढा देत राहावे लागते. कधीकधी आयुष्यभरही .... पण म्हणून काही अशा सगळ्यांचीच बुद्धिमत्ता निष्फळ ठरत नाही, वाया जात नाही. ते या सगळ्यातून कल्पकतेने मार्ग काढतात. तरीही, काही जण मात्र निराशेने जे मिळेल ते करत राहतात, भले ते त्यांच्या क्षमतेपेक्षा कमी असले तरी किंवा निराशेच्या गर्तेत आयुष्य संपवून घेतात. तसेच काही विद्यार्थी मात्र आपली ध्येय सुरवातीपासूनच ठरवून त्या दिशेनेच पावले टाकीत पूर्तता करून स्थिरस्थावर होतात. हीच त्यांची यशाची व्याख्या असते.

ही कादंबरी इंजीनियरिंगचे विद्यार्थी, विशेषतः भारतीय, यांच्या आयुष्याच्या याच वास्तवाचे चित्रण करते.
आय. आय. टी. चे वेगवेगळ्या परिस्थितीतून आलेले तीन विद्यार्थी - हरी, रायन आणि आलोक - यांच्या आयुष्यात तिथे घडलेली कहाणी, म्हणजे ही काल्पनिक कादंबरी. या तिन्ही मित्रांचे प्रवेश, सीनियर विद्यार्थ्यांकडून होणारे रॅगिंग, अभ्यास, स्वप्नं, प्रोजेक्ट्स, मैत्री, प्रेम, कुटुंबासह असलेले नातेसंबंध, या सगळया गोष्टी एकत्र बांधल्या गेल्या आहेत. हरीचे त्याच्या अतिशय कडक शिस्तीच्या प्रोफेसरांची मुलगी नेहा वर जडलेले प्रेम या भोवती हळूहळू अख्खी कादंबरी फिरत राहते,जणू तोच कथेचा मूळ गाभा ठरतो. पदवीधर होण्यापर्यंत मधली वर्षे कशी जातात, यावरून कथा पुढे पुढे सरकत जाते, कधीकधी थेट तर कधीकधी द्वितीय किंवा तृतीयवचनी पद्धतीने आणि कादंबरी शेवटापर्यंत येऊ लागते. अर्थात हा शेवट 'शेवट' नसून तिन्ही मित्रांच्या आयुष्याची खरी सुरवात असणार आहे. या तिन्ही मित्रांना फक्त पाच पॉईंट्सची गरज असते, जी त्यांचे भविष्य उज्ज्वल ठरू देईल की काळवंडून टाकेल हे कादंबरी वाचूनच कळेल. मात्र, आयत्या वेळी, त्यांचे हे शिस्तप्रिय, अतिशय कठोर वागणारे, खुन्नस धरणारे प्रोफेसर त्यांना मार्ग दाखवतात. त्यांच्या या वागणुकीत अचानक झालेला बदल नक्की कसा आणि का झाला हे कादंबरी वाचून वाचकांनी जाणून घेणे अधिक रंजक ठरेल. 

लेखक चेतन भगत लिखित 'फाईव्ह पॉईंट समवन' ही कादंबरी रूपा पब्लिकेशन ने सन २००४ मधे प्रकाशित केली. पुढे सुप्रसिद्ध झालेला हिंदी बॉलीवुड चित्रपट 'थ्री इडियट्स' याच कादंबरीवर आधारित होता. अर्थात, मूळ कथेतील हरी या पात्रापेक्षा रायन या पात्राभोवती चित्रपटाची कथा फिरते.
माझ्या कुटुंबात सर्व इंजीनियरिंग शिकणार्‍या बहीणभावंडांमध्ये मी एकटीच कला शाखेची विद्यार्थिनी. त्यामुळे काही तांत्रिक बाबी जसे प्रोजेक्ट्स, पॉईंट्स,  अशा बाबी समजून घ्यायला कठीण गेलेले सुरुवातीला पण ही कादंबरी सर्वसाधारण वाचकांच्या मनात उत्सुकता निर्माण करते, त्यामुळे या गोष्टी गौण ठरतात, वाचताना फार अडथळे येत नाहीत. 

कॉलेज लाईफ, पुन्हा एकदा तारुण्य अनुभवायचे असेल, आठवणींच्या खजिन्याला हात लावायचा असेल तर नक्की वाचा, 'फाईव्ह पॉईंट समवन' !
माझे स्टार रेटिंग ३-स्टार ⭐⭐⭐

Monday, 9 November 2020

Heidi by Joanna Spyri

My childhood friend, 'Heidi'... Hiding in my bookshelves for many years.... One of my very favourite book among many given by my father to me... Illustrated classic edition! An old, used, second hand book bought from a seller by roadside in Mumbai.


Even now, many beautiful, used books are sold on the footpaths of Mumbai city. We had bought many such old, used books from sellers by the roadside and I had re-read them infinite times.

Orphaned little Heidi living with her maternal aunt is brought to her grandfather (father's father), who is living alone in the mountains. Heidi loves the ambience, enjoys staying up at the mountains in the wooden house. She befriends a little shepherd of her age, Peter. Initially, the strictness of her grandfather who has been nurturing prejudices gradually starts melting down. Rather than saying that he started showering her with his care and love, it was Heidi's spontaneity and innocence awakens the love of her grandfather.
Suddenly, a day arises when Heidi is being sent to a city where she is made to accompany a girl named Clara, of her age, who is a wheelchair user. Clara's father who is a businessman has to be frequently away from her home. Clara has already lost her mother forever. Clara is looked after and her home is being managed by a strict governess. Heidi slowly starts adapting to the life in city and it's hustle and bustle. Heidi and Clara become best friends over the period of time. Their friendship transcends any kind of differences. But, there comes a day when the circumstances make Heidi return to her grandfather's home in the mountains. Clara misses Heidi a lot and visits her. The beauty of the nature, the healthy and nutritious food, friendship with Heidi and Peter, the use of knowledge of physiotherapy by Heidi's grandfather changes Clara's life wonderfully forever.
'Heidi', a beautiful story of innocence and true friendship, written by Johanna Spyri! Do read! Not just for children but for the people who long for the true friendship! 


Later, I got to know that there are many adaptations of this story. This beautiful story was also broadcasted by the Cartoon Network TV channel in animated form.
Here is the link to the video episodes of animated version of Heidi :
https://www.youtube.com/playlist?list=PLS6WGd3J_H0rzQvtmkDDs0_8Jg70wZOn0

My ratings 5-stars ⭐⭐⭐⭐⭐

Wednesday, 4 November 2020

Five Point Someone : by Chetan Bhagat (Rupa Publication)

Generally, a bachelor's life is considered to be fun, full of hopes and dreams, expectations, failures and despairs, love and breakups and moving on, to seek settlement in life and gradually maturing. This is what is reflected in this fictional novel. The location in the story is based from real life, that is, IIT (Mumbai), a dream institute for aspiring 'scholar' engineers. Of course, there are always exceptions. Not all are on the same side of typically considered notions of being a scholar. Such students do struggle with mentalities that try to measure everyone's success on same scales. That doesn't mean that their brilliance is left futile. They find one way or another to channelize it while some get themselves bogged down in some subdued jobs or work which isn't actually suitable for their capabilities. Also, some students have their aims clearly set and they pursue it till they fulfil them and settle down with a fixed routine in life. That's their definition of success. 
This story reflects the facts that the students, especially in India, face in their lives.
Three friends - Hari, Ryan and Alok - coming from three different backgrounds are students of IIT (Mumbai). Their entrance in the institute, introductory ragging by seniors, studies, dreams, projects, friendships, love and relationships with their families, all are tied together. Hari's relationship with Neha, the daughter of a very strict professor takes the central part of the story gradually and the whole theme of the novel revolves around it. Years and years pass on with details of their college life till the graduation nears, so does the end of the novel. A requirement of five points or more is determining their future. An unexpected change in behaviour of their strict professor helps them to pursue their dreams. Of course, the reason behind such change in his behaviour is to be found by the readers themselves between the lines. 
This novel written by Indian author Chetan Bhagat, published by Rupa Publications in 2004, later formed the base of the famous Hindi Bollywood movie '3 Idiots'. 
I myself was the only one in family who studied arts while my cousins studied engineering. I got to know about this novel from one of them. While reading it by borrowing, I found some of concepts like points for projects bit tough to understand but, it didn't hamper my interest in reading. I was engrossed in reading till the end. The way the story is narrated engages the readers. 
Worth reading if you wish to go down the memory lane of your college life. Good one for young adults and also for those who are young at heart, always. 
My rating 3-stars ⭐⭐⭐

Saturday, 31 October 2020

'दिलीप प्रभावळकरांच्या एकांकिका' (भाग - १) : नाट्य लेखक अभिनेते श्री. दिलीप प्रभावळकर

आर्ट्स मधे (२००१, २००२ मधे ११वी आणि १२वी पर्यंत तसेच २००३ ते २००६) अशी ५ वर्षे अभ्यासाच्या निमित्ताने अनेक इंग्लिश, मराठी आणि हिंदी पुस्तके वाचली... तसेच अभ्यासक्रमासाठी रेफरन्ससाठी वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके वाचली. त्यात नाटकाची पुस्तकेसुद्धा होती.
माझ्या बाबांना नाटक पाहायला आवडते. त्यांच्यासोबत अनेकदा सुंदर नाटके बघितली आणि मलाही नाटक आवडायला लागले.
माझ्यासारखेच माझ्या कुटुंबातील काही सदस्यांना वाचन आवडते. माझ्या दोन्ही मोठ्या बहिणींचे पतीही याला अपवाद नाहीत. त्यातील एकांचे हे पुस्तक 'दिलीप प्रभावळकरांच्या एकांकिका' वाचले. ३ नाटकांचा संच असलेल्या पुस्तकांची मालिका आहे, ज्यापैकी हा भाग क्रमांक पहिला आहे - 
एका पुस्तकात तीन विनोदी नाटकांचा संच आहे.
यामधे पहिले 'चूकभूल द्यावी घ्यावी' यावर आधारित मालिकाही प्रसारित करण्यात आली होती. अर्थात ती मालिका एवढी खास जमून आली नाही असे मला जाणवले, म्हणून मी पुर्ण नाही पाहिली. पण पुस्तकातील मूळ नाटक शेवटी धक्कातंत्र वापरून हसवून जाते. सत्तरी आणि ऐंशीव्या वयातील एका नवरा-बायकोने एकमेकांना दिलेली आयुष्यभर केलेल्या गोष्टींची कबुली, यावर हे नाटक आधारित आहे... 
दुसरे नाटक 'सामना' मधील प्रत्येक व्यक्ती नजरेसमोर उभी राहते पण शेवटी तितके रंगले नाही...
तिसरे नाटक 'जेथे जाते, तेथे' मधील सर्व व्यक्तींसंबंधित भूतकाळ फ्लॅशबॅक मध्ये आहे. फक्त प्रत्येक वेळी पात्र भूतकाळातून पुन्हा वर्तमानात येताना कधी आले, ते कळताना मात्र थोडे गोंधळात टाकणारे वाटले. शेवट वाचून मात्र असे नाटकाला नाव का दिले आहे ते कळते.
अभिनेते श्री. दिलीप प्रभावळकर यांच्या काही भूमिका असलेल्या मालिकाही पूर्वी बघितल्या होत्या, जसे 'श्रीयुत गंगाधर टिपरे'. त्यामुळे त्यांच्या लिखाणातून दर्जेदारपणाची अपेक्षा होती. पण तितकीशी ती या पुस्तकात पूर्ण झाल्यासारखं वाटलं नाही. 
हे पुस्तक एकदा वाचायला हरकत नाही.
माझे या पुस्तकाला २ स्टार-रेटिंग ⭐⭐

Thursday, 29 October 2020

Dream Runner (Oscar Pistorius) / 'ड्रीमरनर' (ऑस्कर पिस्टोरियस, सहलेखक गियान्नी मेरलो). मराठी अनुवाद : सोनाली नवांगुळ, मनोविकास प्रकाशन.

(वैयक्तिक आयुष्यात सोनाली माझी जिवलग मैत्रिण असली तरी, मी मला जसे वाटले वाचताना ते व्यक्त करत आहे) :
'ड्रीमरनर' (ऑस्कर पिस्टोरियस, सहलेखक गियान्नी मेरलो). 
याचा अनुवाद केला आहे लेखिका सोनाली नवांगुळ यांनी.... (मनोविकास प्रकाशन). 
इंग्रजीमधे 'ब्लेडरनर' म्हणून ओळखला गेलेला, प्राॅस्थेटिक्सचा वापर करणारा, पॅरॅलिम्पिक्सच नव्हे, तर ऑलिंपिक्स आणि इतर अनेक शर्यतीत भाग घेत, प्राॅस्थेटिक्सचा वापर तांत्रिक फायदा तर देत नाही याची खात्री करून घेतली जाईपर्यंत बंदीला तोंड देत, तसे नसल्याचे वैद्यकीय आणि वैज्ञानिक तपासणी करून सिद्ध करत, विश्वविक्रम रचणाऱ्या धावपटू ऑस्कर पिस्टोरियस याचे धावपटू म्हणून घडतानाचे आयुष्य आणि वैयक्तिक आयुष्य उलगडणारे पुस्तक.... त्याच्यावर गर्लफ्रेंडच्या हत्येचा आरोप लागण्यापूर्वी हे पुस्तक लिहिले गेलेले... 
जन्मतः अम्प्युटेशनची गरज असलेले पाय घेऊन जन्मलेले बाळ पुढे विश्वविक्रम करणारा धावपटू होईल असे कुणाला वाटले पण नसेल..... 
कधी चालण्याचाही अनुभव नसलेली मी... त्यामुळे या धावपटूचे अनुभव, त्यातील तांत्रिक बाबी आणि माहिती समजून घेताना माझी स्वतःची अक्षरशः कसरत झाली.... पण त्यात दिसला एक अतिशय पॅशनेटली मेहनत करणारा धावपटू, लँडमाईन (भुसुरुंग)ने हात-पाय गमावलेल्या माणसांना आर्टिफिशियल लिंब्स वापरणाऱ्यांना आपला प्राॅस्थेटिक्सचा अनुभव उपयोगी पडावा म्हणून काम करत असणारा समाजसेवक.... 
त्यावेळी पुस्तक अनुवादित करताना, इंग्रजीमधून मराठीत भाषांतर करताना सोनाली कदाचित नवखी असावी अनुवादात, म्हणून सुरुवातीला काही वेळा वाक्यरचना जशीच्या तशी वाटली पण पुढे इतके ते मस्त जमले आहे की असे वाटते ऑस्कर पिस्टोरियस स्वतःच आपल्यापाशी गप्पा मारत बसला आहे....!
एक वेगळा विषय असलेले खूप सुंदर पुस्तक आहे ! नक्की वाचा.... धावपटू म्हणून त्याच्याकडे बघा, तर त्या पुस्तकाच्या लेखनाला न्याय मिळेल... ऑस्कर स्वत:सुद्धा याच कारणासाठी आरोपाला सामोरा गेला, हे सिद्ध करण्यासाठी की मेहनतीने तयार झालेला खेळाडू हा खेळाडू असतो, त्यात कोणताही भेदभाव नको.....
या पुस्तकाला GoodReads वर माझे ३ स्टार रेटिंग :
⭐⭐⭐

Sunday, 25 October 2020

हायडी - लेखिका जोहाना स्पायरी

माझी लहानपणीची मैत्रीण हायडी, 'Heidi'... कपाटात होती इतकी वर्षे.... माझ्या बाबांनी मला माझ्या लहानपणी दिलेल्या पुस्तकांपैकी माझे एक आवडते पुस्तक.... थेट Illustrated classic edition! 
अजूनही मुंबईमधल्या फूटपाथवर वापरलेली, जुनी, used म्हणजे सेकंड हँड पुस्तके मिळतात. तिथे घेतलेले... अशी सेकंड हँड पुस्तके तर कित्येक वेळा विकत आणली होती आणि वाचून वाचून अक्षरशः पारायणे केली होती त्यांची..... 


अनाथ हायडी (Heidi) मावशीकडून आजोबांकडे (वडिलांचे वडील) रहायला येते... मस्त डोंगरावर राहते, पिटर नावाचा छोट्या मेंढपाळाच्या संगतीने रमते... सुरवातीला कडक, मनात अढी असलेले आजोबा हळूहळू तिला आपलेसे करून घेतात म्हणण्यापेक्षा तीच त्यांची माया जागी करते... अचानक एक दिवस हायडीची रवानगी शहरात एक आई वारलेली आणि वडील कामात व्यस्त असल्याने घर सांभाळणारी बाई (गव्हर्नेस) बरोबर राहणाऱ्या अपंग क्लारा (Clara) ची सोबत करण्यासाठी केली जाते... गावाकडे डोंगरावर राहणारी हायडी हळूहळू शहरात रूळते... कोणत्याही प्रकारच्या भेदभावाविना दोघींची घट्ट व निखळ मैत्री होते पण हायडीला एक दिवस पुन्हा गावी परतावे लागते... क्लारा तिच्या आठवणीने व्याकूळ होऊन तिच्याकडे जाते... मैत्री, मोकळे वातावरण, पोषक आहार आणि हायडीच्या आजोबांच्या ज्ञानाचा वापर होऊन फिजिओथेरपी द्वारे क्लाराचे आयुष्य बदलते... 
लेखिका जोहाना स्पायरी लिखित एक निरागस मुलगी हायडी (Heidi) ची ही सुंदर कथा... नक्की वाचा...! 
या कथेला अ‍ॅनिमेशन स्वरूपातही काही वर्षांपूर्वी कार्टून नेटवर्क या टीव्ही चॅनेलवर दाखवले होते.... या पुस्तकाची अनेक अडाप्टेशन्स आहेत असे कळले.



लेखिका जोहाना स्पायरी यांच्याविषयी थोडीशी माहिती :

'हायडी' चे अ‍ॅनिमेशन स्वरूप :
https://www.youtube.com/playlist?list=PLS6WGd3J_H0rzQvtmkDDs0_8Jg70wZOn0

माझे रेटिंग ५-स्टार्स ⭐⭐⭐⭐⭐

The Art of Paint Pouring : Amanda VanEver (Walter Foster Publishing, an imprint of Quarto Publishing Group, USA)

There are some days, when something suddenly grabs not just attention of the eyes, but takes up its own place in the heart…. It doesn’t let ...