माझ्या बाबांना नाटक पाहायला आवडते. त्यांच्यासोबत अनेकदा सुंदर नाटके बघितली आणि मलाही नाटक आवडायला लागले.
माझ्यासारखेच माझ्या कुटुंबातील काही सदस्यांना वाचन आवडते. माझ्या दोन्ही मोठ्या बहिणींचे पतीही याला अपवाद नाहीत. त्यातील एकांचे हे पुस्तक 'दिलीप प्रभावळकरांच्या एकांकिका' वाचले. ३ नाटकांचा संच असलेल्या पुस्तकांची मालिका आहे, ज्यापैकी हा भाग क्रमांक पहिला आहे -
यामधे पहिले 'चूकभूल द्यावी घ्यावी' यावर आधारित मालिकाही प्रसारित करण्यात आली होती. अर्थात ती मालिका एवढी खास जमून आली नाही असे मला जाणवले, म्हणून मी पुर्ण नाही पाहिली. पण पुस्तकातील मूळ नाटक शेवटी धक्कातंत्र वापरून हसवून जाते. सत्तरी आणि ऐंशीव्या वयातील एका नवरा-बायकोने एकमेकांना दिलेली आयुष्यभर केलेल्या गोष्टींची कबुली, यावर हे नाटक आधारित आहे...
दुसरे नाटक 'सामना' मधील प्रत्येक व्यक्ती नजरेसमोर उभी राहते पण शेवटी तितके रंगले नाही...
तिसरे नाटक 'जेथे जाते, तेथे' मधील सर्व व्यक्तींसंबंधित भूतकाळ फ्लॅशबॅक मध्ये आहे. फक्त प्रत्येक वेळी पात्र भूतकाळातून पुन्हा वर्तमानात येताना कधी आले, ते कळताना मात्र थोडे गोंधळात टाकणारे वाटले. शेवट वाचून मात्र असे नाटकाला नाव का दिले आहे ते कळते.
अभिनेते श्री. दिलीप प्रभावळकर यांच्या काही भूमिका असलेल्या मालिकाही पूर्वी बघितल्या होत्या, जसे 'श्रीयुत गंगाधर टिपरे'. त्यामुळे त्यांच्या लिखाणातून दर्जेदारपणाची अपेक्षा होती. पण तितकीशी ती या पुस्तकात पूर्ण झाल्यासारखं वाटलं नाही.
हे पुस्तक एकदा वाचायला हरकत नाही.
माझे या पुस्तकाला २ स्टार-रेटिंग ⭐⭐
No comments:
Post a Comment